First blog post

This is the post excerpt.

Advertisements

अध्यात्म.

🌹🌹 १४ एप्रिल – संत आपल्याला जागे करतात. 🌹🌹   प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते, हे ज्याप्रमाणे…

०५/०४/२०१७ 🌸चिंतन🌸 धान्यामध्ये काही असे खडे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात, त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात; पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असे नाही. साधूचे एकच लक्षण सांगता येईल, ते हे की, जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू. पण एवढयावरून आपल्याला तोओळखता येईल का..? नाही; तर जेव्हा आपण साधू व्हावे, तेव्हाच आपल्याला साधूला ओळखतायेईल.जगात आपण कुणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसर्याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्या वेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे; आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन, ‘हे माझे दुर्गुण काढून टाक’, म्हणून त्याची करूणा भाकावी. आपण जेव्हा ‘जगात न्याय उरला नाही’ असे म्हणतो, त्या वेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असे समजावे. म्हणून आपण कुणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवद्भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसर्याचे दोष दिसतात, तेव्हा आपलेच चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण परमात्म्याची करूणा भाकून त्याला शरण जावे, आणि ‘माझे चित्त शुद्ध कर’ अशी त्याला विनंती करावी. असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते, आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही.जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते; उदा भाजणी. मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसे खरे, त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते. पण आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचे चालणे हळू, आणि बोलणे मृदू असते. तो सर्वांना प्रिय होतो. जगातले आपले समाधान किंवा असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. ‘माझ्याकरिता मी नसून, मी लोकांकरिता आहे. माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे,’ ही वृत्ती आपण ठेवावी…. 🌸रामकृष्णहरी🌸 -आपला दिवस आनंदात जावो-

🙏 💐💐💐💐💐💐💐🙏 ढोक महाराज यांच्या कीर्तनातला सांगितलेला दृष्टांत———- एक गरिब ९२ वर्षाचा म्हातारा वारकरी गुडघ्या पर्यँत धोतर, गळ्यात पविञ तुळशीची माळ,डोक्याला फेटा बांधलेला आणि कपाळाला गोपी चंदनाचा टिळा त्या म्हाताऱ्या बाबाची भगवान पांडुरंगावरती निस्वार्थ श्रद्धा पण भक्तिच गर्व अजिबात नाहि.असे हे म्हातारे बाबा रस्त्याने जात असताना एक राजा मोठया थाटात देवीची पुजा करत होता सगळि जनता समोर बसलेली होती भालदार चोपदार बाजुला उभे होते.तेवढयात हे वारकरी बाबा तिथे आले आणि नित्यनेमाप्रमाणे म्हाताऱ्या वारकरी बाबाने वाकुन राजाला नमस्कार केला, “रामराम मायबाप” राजाने वर पाहल आणि म्हटला, “रामराम, पंढरीचे वारकरी का तुम्हि” बाबा म्हटले, “होय मायबाप” राजा म्हटला, “काय आहे रे तुमच्या देवाजवळ एक पितांबर अन तुळशीची माळ अन त्याचे तुमी दरिद्री भक्त आमची देवी बघ पायापासुन डोक्यापर्यँत कशी सोन्याची आहे.” म्हाताऱ्या बाबाला पांडुरंगाचा केलेला अपमान सहन नाहि झाला आणि राजाला म्हटले, “ये राजा, आम्हि ज्याचे भक्त आहे ना त्याच नगर सोन्याच आहे अन ज्या देवीची तु बढाई सांगतोस ती देवी माझ्या पांडुरंगाच्या दरबारात झाडपुस करायला आहे.” राजा एकदम चकित झाला, अन म्हणाला “म्हातारे बाबा, जर का नगर सोन्याच अन देवी झाडपुस करायला नसली तर भर सभेत तुमच मुंडक उडवल्या जाईल.” आणि वारकरी बाबा म्हटले “जर का नगर सोन्याच अन देवी झाडपुस करायला असली तर तु काय करशिल राजा.” राजान उत्तर दिल, “आयुष्यभर पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी करीन.” आणि मग राजा आणि वारकरी बाबा निघाले पंढरपुरला वारकरी बाबा भगवंताला विनवनी करु लागले “पांडुरंगा १० वर्षाचा होतो तेव्हापासुन न चुकता तुझी वारी करतो आयुष्यात सुतळिचा तोळा सुद्धा नाहि मागितला रे तुला पण आज राजाने मला दुःखी केलय त्याच्याकरिता फक्त ह्या दोन गोष्टी पंढरपुरात तयार ठेव एक नगर सोन्याच अन दोन देवी झाडु घेऊन उभी ठेव.” आणि ईकडे राजाच्य मनात कुजबुज चालु “कस असेल पंढरपुर.” पाहता पाहता पंढरपुर जवळ आल आणि वारकरी बाबा म्हटले “राजा हे जे दिसते ना हेच पंढरपुर.” राजाने टाका उंच करुन बघितल काय दिसल राजाला झळझळित सोनसळा । कळस दिसतो सोज्वळा ।। बरवे बरवे पंढरपुर । विठोबारायाचे नगर ।। माहेर संतांचे । नामया स्वामी केशवाचे ।। आणि राजा म्हटला “खर आहे बाबा तुमच नगर सोन्याच आहे.” आणि मग पुढे चंद्रभागेतुन आंघोळ करुन नामदेव पायरी जवळ आले राजाने वर पाहायच्या आत महाद्वारात झाडु घेऊन उभ्या असलेल्या देविनेच विचारल “राजा ईकडे कुठ रे” राजा म्हटला “आई तु ईकडे कुठ” “अरे राजा हि झाडपुस करायची सेवा रोज माझ्याकडे आहे.” आणि वारकरी बाबाच्या डोळ्यातुन पाणी वाहु लागल राजा म्हटला “वारकरी बाबा तुमच म्हणन खर झाल तरी तुमी का रडता?” वारकरी बाबा म्हटले “राजा ८२ वर्ष झालेत पंढरीची न चुकता वारी करतो पण अजुनही मी नगर सोन्याच अन देवी झाडु घेऊन उभी पाहली नाहि पण आज या भक्ताची लाज राखण्याकरता माझ्या पांडुरंगाने या दोन्हि गोष्टी ईथ तयार ठेवल्या म्हणुन रडतो.” माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणची देव होय गुरु ।। पढिये देहभाव पुरवी वासना । अंती ते आपणापाशी न्यावे ।। तात्पर्य: भक्ती करा पण त्या भक्तिचा अहंकार करु नका आणि समोरच्या व्यक्तिच्या श्रद्धेत असलेल्या देवतेचा अपमान व त्या श्रद्धेपोटी असलेल्या त्याच्या मनातील भावना कदापी दुखऊ नका 🌺🌺राम कृष्ण हरी🌺🌺